इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे रजेवर,अति. आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे कार्यभार

इचलकरंजी शहराची वस्त्रनगरी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. येथील यंत्रमाग असतील किंवा येथील पाण्याचा प्रश्न तसेच राजकीय वातावरण यामुळे इचलकरंजी महापालिका ओळखीची आहेच. इचलकरंजी नगरपालिकेचे तीन वर्षापूर्वी महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्त करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांमध्ये महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली नसल्यामुळे महानगरपालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात नाही.
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे काल १३ फेब्रुवारी पासुन रजेवर गेले आहेत. आयुक्त यांच्या रजेच्या मुदतीत त्यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचेकडे राहणार आहे.असे महानगरपालिकेकडून कळवण्यात आले आहे.