आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मंजूर

सध्या प्रत्येक भागात अनेक सेवा सुविधांचा अभाव असतो. वेळोवेळी याची मागणी केली जाते. काही प्रश्न पाठपुराव्याने मार्गी देखील लागलेले आहेत. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मंजूर झाली आहे. याबाबत विशेष प्रत्येक संचालक तानाजीराव पाटील यांनी केले. त्यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार पाठपुरावा करून शाखेस मान्यता देण्यात आली आहे. 

शाखा मंजूर झाल्यामुळे संचालक तानाजीराव पाटील यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्यातील सर्व शाखांचे काम उल्लेखनिय आहे शेतकरी उन्नतीसाठी बँक कटीबध्द असून ग्राहकांना सेवा, सुविधा देण्यासह गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न आपण करत असून बनपुरीकरांची मागणी पूर्ण करताना आनंद होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.