इचलकरंजी बंदला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

इचलकरंजीमध्ये आज शुक्रवारी समस्त हिंदू बांधवांच्या वतीने इचलकरंजी बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे. अत्याचार बांगलादेश येथील मंदिरांवर व हिंदूंवर अत्याचार झाल्या प्रकरणी इचलकरंजीवासी यांनी बंदची हाक दिलेली होती. साडेनऊ वाजता बस स्थानकामध्ये एसटी आली असता यावेळी समस्त हिंदू बांधवांनी एसटी बंद करण्याची आवाहन केले. महामंडळाने देखील प्रतिसाद दिला व शांततेची आवाहन केले.

तर इचलकरंजी शहर सकाळी नऊ पासून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून बंदला मोठा प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच व्यवसाय बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तर सकाळच्या सुमारास एसटी बस सुरू ठेवण्यात आल्या होत्या. काही बस सुरू होत्या त्या देखील बंद करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तर यावेळी स्थानकामध्ये डीवायएसपी समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी येऊन आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद हिंदू बांधवांनी दिला आहे.

शहरातील रिक्षाचालक संघटना, टेम्पोचालक, समस्त मुस्लिम बांधव यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शहरातील कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डी वाय एस पी समरसिंह साळवी, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त कबनुर,शहापूर इचलकरंजी शहरांमध्ये ठेवण्यात आला होता.

आज इचलकरंजी सकाळपासून प्रतिसाद मिळत होता. याला हिंदू बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. राजवाडा चौक, गांधी पुतळा चौक, जनता बँक, शिवतीर्थ चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक, डेक्कन चौक,कोरोची चौक या आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज संध्याकाळी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले.