इस्लामपूर तालुक्यातील कुरळपमध्ये आज खेळ पैठणीचा कार्यक्रम 

सध्या अनेक भागात विविध सामाजिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अलीकडच्या काळात तर पैठणीच्या खेळाचे आयोजन अनेक भागात केले जाते. कुरळप पी.आर. पाटील (दादा) फाउंडेशन, कुरळप यांच्यातर्फे महिलांकरिता आज शुक्रवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी, विनोद व नकला असलेल्या महिलांसाठी रंगतदार कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. नीलेश पापत निवेदक म्हणून काम पाहणार आहेत, तर या कार्यक्रमासाठी महिलांना मोफत प्रवेश असून कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे. पी. आर. पाटील यांनी हनुमान ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून सलग दहा वर्षांपासून गावात व्याख्यानमाला कार्यक्रम सुरू केला आहे. पाच दिवसांच्या या व्याख्यानमालेत आतापर्यंत अनेक दिग्गज वक्त्यांनी सहभाग घेतला आहे.