हातकणंगले तालुक्यातील चंदूरातील शेतकऱ्यांचे आज होणारे आमरण उपोषण स्थगित

काही ना काही मागण्यांसाठी आंदोलन तसेच उपोषण अनेक भागात केले जाते. या आंदोलनाला काही यश देखील प्राप्त होते म्हणजेच त्या मागण्या मान्य केल्या जातात. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील पंचगंगा नदी पात्रातील पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी लवकरात लवकर देऊन नुकसान टाळावे. या मागणीसाठी चंदूर येथील अरुण विविध कार्यकारी सेवा संस्था व शेतकऱ्यांच्यावतीने कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयासमोर आज शुक्रवार ता. १४ रोजी आमरण उपोषण होणार होते.

तथापि पाटबंधारे विभाग आणि अरुण विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये झालेली चर्चा आणि पाटबंधारे विभागाने दिलेले लेखी आश्वासन याचा विचार करून आमरण उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती अरुण विकास सेवा सोसायटीच्यावतीने प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.