निवडणूक खर्चात तासगाव, खानापूर, शिराळा तालुका आघाडीवर; कोणत्या उमेदवाराने केला सर्वाधिक खर्च..

विधानसभा निवडणुकीच्या खर्चात पहिल्या टप्प्यात तासगाव, खानापूर आणि शिराळा मतदारसंघ आघाडीवर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी प्रचार कालावधीतील १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे.

मतदारसंघ आणि प्रमुख उमेदवारांचा खर्च असा :

तासगाव-कवठेमहांकाळ :
रोहित पाटील – १६ नोव्हेंबरपर्यंत – २६ लाख ९३ हजार ५५५.
संजय पाटील – १४ नोव्हेंबरपर्यंत – ३० लाख ८० हजार ३०८.
जत –
गोपीचंद पडळकर – ६ नोव्हेंबरपर्यंत – ७ लाख ५८ हजार ३४६,
तम्मनगौडा रवीपाटील – १६ नोव्हेंबरपर्यंत – १२ लाख ५७ हजार १३०.
विक्रमसिंह सावंत – १६ नोव्हेंबरपर्यंत – १९ लाख १७ हजार २९३.
खानापूर-
सुहास बाबर – १८ लाख ६ हजार ९२२,
वैभव पाटील – २१ लाख ६३ हजार ४३५,
राजेंद्रअण्णा देशमुख – ८ लाख ४५ हजार ७२ (तिघेही १६ नोव्हेंबरपर्यंत).

पलूस-कडेगाव –
डॉ. विश्वजित कदम – ६ नोव्हेंबरपर्यंत – ८ लाख २७ रुपये,
संग्रामसिंह देशमुख – ८ नोव्हेंबरपर्यंत – २ लाख ३८ हजार ३२०.
सांगली-
जयश्री पाटील- ८ लाख ८३ हजार ९१९,
पृथ्वीराज पाटील – १२ लाख २ हजार ९८ (दोघेही १२ नोव्हेंबरपर्यंत),
सुधीर गाडगीळ – १६ नोव्हेंबरपर्यंत – १५ लाख ५४ हजार २८१.
इस्लामपूर –
जयंत पाटील – ८ लाख ४६८ रुपये,
निशिकांत पाटील – ८ लाख ९६ हजार ५७१ (दोघेही १२ नोव्हेंबरपर्यंत).
शिराळा-
सत्यजित देशमुख – १९ लाख ९५ हजार १६७,
मानसिंगराव नाईक – १७ लाख ४४ हजार ५०० (दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत).

मिरज –
सुरेश खाडे – १५ लाख ८५ हजार ६३४,
तानाजी सातपुते – १५ लाख ९४ हजार ४९६. (दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत)