मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी संदर्भात बैठक होणार आहे. नवी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये बैठक होणार आहे. महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रयागराजला जाणार आहेत. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात स्नानाचं नियोजन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेणार भेट….
