31 जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा…

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने जोरदार दणका दिल्यानंतर आता ऑगस्ट महिना देखील पाऊस गाजवणार आहे. भारतीय हवामान खात्याने 31 जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील ऑगस्ट च्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढणार असल्याचे म्हटले आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 31 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्रात रिमझिम पाऊस पडणार नाही तर जोराचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.

या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन पडणार आहे. जिथे कडक ऊन पडणार त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार आहे. जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. मात्र आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.