‘छावा’चा महाराष्ट्रात बोलबाला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छापले कोट्यवधी, पहिल्या दिवशी किती कोटी कमावणार सिनेमा?

 अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांचा बहुप्रतीक्षीत ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाचा बोलबाला दिसत आहे. सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आह. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमासाठी पहिलाच दिवस खास असणार आहे… तर विश्लेषकांच्या मते पहिल्या दिवशी सिनेमा किती कोटींची कमाई करु शकतो? जाणून घेऊ…

सध्या सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. अखेर सिनेमा प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी जमली. सॅकनिल्कीच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ने प्री-बुक केलेल्या तिकिटांच्या विक्रीतून अंदाजे 13.78 कोटी रुपये कमावले आहेत.

या सिनेमाने देशभरात 14,063 हून अधिक शोसाठी 4.87 लाख तिकिटांची विक्री केली आहे.सांगायचं झालं तर, सिनेमाने नेट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 13 कोटींची कमाई केली आहे. तर ब्लॉक सीट्ससह एकूण 17.87 कोटी रुपये गल्ल्यात जमा झाले आहेत. ‘छावा’ सिनेमाची बंपर ॲडव्हान्स बुकिंग पाहता, इंडस्ट्रीतील विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, विकी कौशलचा सिनेमा पहिल्याच दिवशी 23 – 25 कोटी रुपयांच्या कमाईने सुरुवात करू शकतो.

ट्रेंड विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सिनेमाला माऊथ पल्बिलिटीचा अधिक फायदा होऊ शकतो. ‘छावा’ सिनेमा महाराष्ट्रात अधिक कमाई करु शकतो असं देखील सांगण्यात येत आहे. दिल्ली वगळता अन्य राज्यांमध्ये सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा देखील कमी कमाई केली आहे.