सध्या अनेक घडामोडीना वेग आलेला आहे. अनेक भागात गुन्हेगारी, अवैद्य धंदे, खून, मारामारी तसेच फसवणूक यामध्ये दिवसागणिक वाढच होऊ लागली आहे. खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या निलंबनाच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे, खानापूर तहसीलदार पदावर ते कायम राहिले आहेत. तहसीलदार गायकवाड यांच्यावर लोकायुक्त पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.
याबाबत गायकवाड यांनी न्यायालयात स्पष्टीकरण देताना आपली पत्नी कॅनरा बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करते. त्याशिवाय मुलगा आर्किटेक्ट असल्याचे निदर्शनास आणून देऊन स्थगिती आदेशही सादर केला होता. या स्थगिती आदेशाचा विचार न करता राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाई विरोधात गायकवाड यांनी राज्य प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. 5 मार्च रोजी लवादासमोर पुढील सुनावणी होणार आहे.
तोपर्यंत निलंबनाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदार गायकवाड यांनी पुन्हा खानापूर तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. लोकायुक्तांचा छापा, त्यानंतर झालेले निलंबन आणि आता पुन्हा स्थगिती यामुळे खानापूरचे तहसीलदारपद अस्थिर झाले आहे.