वैभव पाटील यांच्यासमोरच माजी नगरसेवकाने केला मोठा खुलासा

सगळीकडेच आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर नेतेमंडळींची धावपळ सुरू झालेली पाहायला मिळत आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाची वर्णी लागणार म्हणजेच कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी अजूनही तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अशातच खानापूर मतदारसंघात चर्चेला उधाण आलेले आहे. खानापूर तालुक्यातील घोटी येथील एका कार्यक्रमानिमित्त वैभवदादा व माजी नगरसेवक ॲड. विजय जाधव हे एकाच मंचावर उपस्थित असताना मोठा खुलासा केला. आम्ही सर्वजण वैभव दादांबरोबरच आहोत आम्ही कुठेही गेलेलो नाही. मतदारसंघात याची जोरदार चर्चा सुरू आहे.