शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आ. देशमुख यांनी दिले आश्वासन……

सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न देखील चालू केले आहेत. अनेक भागात त्यांचा सत्कार समारंभ देखील नागरिकांकडून केला जात आहे. जिव्हाळा परिवाराच्या वतीने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन रामभाऊ यादव, पंढरपूर तालुका संघाचे अध्यक्ष दत्तात्रय येडगे, तालुका संघाचे कार्यकारी अध्यक्ष संपतराव देशमुख व पंढरपूर आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. 

झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच जिव्हाळा परिवारातील सदस्य बहुतांश शिक्षक असल्याने सदर शिक्षकांनी वाड्या-वस्तीवरील महिलांचे प्रबोधन करून हिमोग्लोबिन वाढवण्याबाबत जागृती करावी व विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केले. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले.

प्रास्ताविकामध्ये रामभाऊ यादव यांनी शिक्षणाची सध्याची परिस्थिती व त्यावरील अडचणी दूर करण्याबाबत प्रश्न मांडले. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडण्याची विनंती केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न अधिवेशनात मांडू शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याचे काम करतात. या शिक्षकांच्या देखील अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडविण्या संदर्भात तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन आ. देशमुख यांनी दिले आहे.