आम.शहाजीबापू पाटील यांच्या पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!

आमदार शहाजी बापू पाटील यांनी 2019 मध्ये आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात कोट्यावधी रुपयाची विकास कामे मंजूर करून ती मार्गी लावली कार्यतत्पर आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या. आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होऊ दिली नाही.

त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणीदार आमदार म्हणून तालुक्यासह राज्यात ओळखले जाते. महाराष्ट्रात राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आमदार शहाजी बापू पाटील यांच्या” पाणीदार आमदार “या कार्याला अहवालाचे प्रकाशन शुक्रवार मुंबई येथे मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आले .आमदार शहाजीबापू पाटील उद्योगपती प्रवीण चौगुले, युवा नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.