मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते डिकसळ येथील धावपटू शशिकांत याचा सत्कार


सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील तरुणाने नुकत्याच पार पडलेल्या क्रॉस कंट्री या स्पर्धेत सहभाग घेण्याकरता भरण्यासाठी पैशाची टंचाई असताना देखील या परिस्थितीमध्ये आई-वडील ऊस तोडी करीत असताना आपल्या या परिस्थितीशी संघर्ष करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोलापूर येथील मैदान गाजवले आहे आणि सांगोला तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

ऊसतोड कामगारांचा मुलगा शशिकांत जगू चव्हाण यांनी परिस्थितीशी झुंज देऊन राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत यशस्वी गरुड झेप घेत द्वितीय क्रमांक पटकविला आहे आणि हा यशाचा मानकरी ठरला आहे. म्हणून त्याचे कौतुक करण्यासाठी शिवसेना नेते मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी विजेत्या तरुणाचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलेला आहे. तसेच या विद्यार्थ्यांचा आदर्श सांगोला तालुक्यातील इतर तरुणांनी घ्यावा अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत. गरीबाच्या पोरांन नाव कमावलं आणि गावाचं नाव राज्यात उज्वल केलं असं उद्गार माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी यावेळी काढले.