सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकची सुनावणी निकाली लागणार आहे. येत्या २५ फेब्रुवारीला कोर्ट देणार निकाल असं समजत आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक आपापली मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत.लवकरच कोर्टाचा निकाल येईल व त्वरित निवडणुका लागतील असं दिसतं आहे.
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असतो. त्यात प्रभाग रचना व निवडणुका उरकायच्या असतात. जर २५ फेब्रुवारी रोजी कोर्टाचा निकाल लागला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात अगदी प्रभाग रचना जाहीर केल्या जातील. १५ दिवसांच्या आत त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यानंतर एप्रिल महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील व मे महिन्यात मतदान आणि निकाल असेल.