इस्लामपूर येथील आरआयटीच्या वसतिगृह, जिम्नॅशिअमच्या उद्घाटन समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

सध्या अनेक विकासकामांचा धडाका अनेक भागात सुरु आहे. अनेक निधी देखील मंजूर केले जात आहेत. इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत अभियांत्रिकी महाविद्यालयात १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर. डी. सावंत व महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. आर. डी. सावंत यांनी, महाराष्ट्रामध्ये प्रथमय प्रि- इंजिनियर्ड बिल्डिंग या अत्याधुनिक आणि  प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरआयटीमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह निर्माण झाले आहे. या इमारतीच्या तळमजल्यात एकाच वेळी एक हजार विद्यार्थी जेवण करू शकतील एवढ्या मोठ्या डायनिंग हॉलची  सोय आहे. तसेच अत्याधुनिक  जिम्नॅशिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धकांच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक मशीन्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.

डॉ. पी. व्ही. कडोले यांनी, या उत्कृष्ट प्रकारच्या स्थापत्य अभियांत्रिकीचा नमुना आहे. या वस्तीगृहाच्या उद्घाटन समारंभासाठी आ. जयंतराव पाटील आणि भगतसिंह पाटील यांच्या आग्रहास्तव नितीन गडकरी यांना निमंत्रित केल्याचे सांगितले.