विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत पूर्वभाग पत्रकार संघटनेकडून निषेध,कारवाईच्या मागणीसाठी निवेदन

सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसतच आहे. विटा येथे एमडी ड्रग्ज सापडल्याने देखील नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, तसेच विटा शहरातील गुन्हेगारी आणि अवैद्य व्यवसाय मोडून काढा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून गुन्हेगारी मोडीत काढू, असा खणखणीत इशारा विटा शहरातील शेकडो नागरिकांनी गुरूवारी प्रशासनाला दिला. 

विटा शहरांमधील स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली.या घटनेचा निषेध आणि संबंधित दोघा आरोपींवर आणि त्यांना हल्ला करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींवर कडक कायदेशीरकारवाई करावी यासाठी उमदी परिसरातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करुन उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी विविध दैनिक आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार हल्ला कृती समितीचे तालुकाध्यक्ष राहुल संकपाळ, महादेव कांबळे, लखन होनमोरे, सुभाष कोकळे, राजू पुजारी, विनोद राठोड, रामणा सनाळे, पांडुरंग कोळळी, धानप्पा कोहळी, सतीश आजमाने, रियाज जमादार, राजेभक्षर जमादार, यलाप्पा कावडे यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.