प्रत्येक भागात अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यात नागरिकांचा सहभाग देखील उत्स्फूर्तपणे देखील दिसून येतो. सध्या अनेक भागात जैन समाज बांधवांकडून पंचकल्याण महापूजा केली जात आहे. वाळव्यात कोटभागावरील जैन समाज बांधवांकडून पंचकल्याण महापूजा सध्या मोठ्या उत्साहात सुरु आहे. रविवारी पूजेचा तिसरा दिवस होता. २० तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. राज्यभरातून जैनसमाज श्रावक, श्राविका मोठ्या प्रमाणावर वाळव्यात दाखल झाले आहेत. शुक्रवारी पुजेच्या प्रारंभ दिनी आ. जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिलीपराव पाटील व कार्यकर्त्यांसह उपस्थीत राहून जैनमुनींचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाचे यजमानपद महावीर होरे व सौ. डॉ. वंदना महावीर होरे यांच्याकडे असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आ जयंत पाटील यांनी भेटीवेळी पंचकल्याण पूजेसाठी ५ लाखांची देणगी देण्याचे अभिवचन दिले होते. त्याप्रमाणे माजी जि. प. सदस्य राजेंद्रभाऊ पाटील यांच्या हस्ते ५ लाख रुपयांचा धनादेश यजमान महावीर होरे यांना प्रदान करण्यात आला.