विटा तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीवर आम. सुहास बाबर आणि आम. विश्वजीत कदम यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आहे. बाबर – कदम गटाच्या संदीप पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सरपंच आनंदराव आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी युवराज धनवडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच आदाटे यांनी जाहीर केले. या निवडीनंतर नूतन उपसरपंच युवराज धनवडे यांचा आ. सुहास बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रामचंद्र शिंदे, सलीम संदे यांच्यासह मान्यावर उपस्थि होते.
भाळवणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी नूतन उपसरपंच धनवडे यांनी दिली. विटा तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवराज धनवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच आनंदराव आदाटे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेस माजी सरपंच महेश घोरपडे, राजेंद्र शिंदे, सयाजी धनवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.