प्रत्येक भागात भाजप सदस्य नोंदणीला खूपच चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. तर अनेक ठिकाणी कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र देखील पहायला मिळाले. आटपाडी शहराचे उगवते नेते विकास भुते यांनी अल्पवधीत काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे १००० सदस्य नोंदणी केल्या बद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकास भुते यांना पत्र पाठवून त्यांचे कौतुक करीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वा मध्ये आपण १००० सदस्य नोंदणीकरून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्मितीच्या प्रवासात सहभाग करून घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
भाजपचे अंतोदयाचे धोरण आपण जनसामान्यात घेऊन जात आहात यातून आपली लोकप्रति असल्याची बांधिलकी व पक्ष विचाराप्रती असलेली निष्ठा आधारोखीत होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून मला आदर व अभिमान वाटतो असा पत्राद्वारे उल्लेख केला आहे.आटपाडीचे युवा नेते विकास भुते यांनी भारतीय जनता पार्टीचे १००० सदस्य नोंदणी केल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते श्रीफळ शाल फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
सत्कार प्रसंगी विकास भुते म्हणाले, एक हजार सदस्य नोंदणी करण्यासाठी ओटीपी आवश्यक असतो. ओटीपी दिल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे सदस्य होत नाही सर्व सदस्यांचा विश्वास सार्थ संपादन करून १००० सदस्यांची नोंदणी केली आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी भाजपची तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, बाजार समितीचे माजी संचालक विष्णुपंत अर्जुन, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु टी जाधव चौंडेश्वरी पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख चंद्रकांत दौंडे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.