खा. धैर्यशील मानेंच्या हस्ते आष्ट्यात आज शीतशवपेटी वितरण

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. तसेच अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. शिवसेनेतर्फे शिवजयंती दिनी मोफत डेडबॉडी फ्रिजर (शितशवपेटी) वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शीतशवपेट्यांचे वितरण शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम बुधवारी सकाळी नऊ वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात होणार आहे. यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, राहुल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली.

यापूर्वी वीर कुदळे यांच्या संकल्पनेतून डॉल्बी, लेसरशो आणि मिरवणुका न काढता मोफत स्वयंरोजगार मेळावा, शेतकऱ्यांसाठी मोफत औषध फवारणी पंप, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी लाख रुपयांची मोफत पुस्तके, कचरा संकलनासाठी मोफत बकेट, वाहनचालकांसाठी मोफत कापडी वॉटर बॅग वाटप, अपघाती विमा अभियान, गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, निराधार विधवा महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप असे विधायक कार्यक्रम झाले आहेत. कुटुंबातील व्यक्तींचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास आणि नातेवाईक दुरगावी असल्यास मृतदेहाचा दफन दहन विधी करणे व अंत्यदर्शन व धार्मिक विधीसाठी वेळ लागू शकतो.

या दरम्यान मृतदेह सडण्याची, दुर्गंधी येण्याची प्रक्रिया सुरू होते ही गैरसोय लक्षात घेता शिवसेनेतर्फे यावर्षी विधायक कार्यक्रम म्हणून मोफत डेडबॉडी फ्रिझर शितशवपेटी वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्हाउपप्रमुख नंदकुमार निळकंठ, तालुका प्रमुख सागर मलगुंडे, तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, माजी नगरसेवक अमोल पडळकर, शहरप्रमुख राकेश आटुगडे, उपशहरप्रमुख गणेश माळी यांची प्रमुख उपस्थिती आहे.