अनेक धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. या स्थळांना अनेक नेतेमंडळी, सिनेस्टार तसेच अनेक क्रिकेटर भेटी देत असतात. तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी दुपारी दत्त दर्शन घेतले. यावेळी सचिन यांची पत्नी अंजली, मुलगी सारा तसेच मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी श्री. दत्तात्रेयांचे दर्शन घेतले.
आज सकाळी कोल्हापुरातील विमानतळावर तेंडुलकर कुटुंबिय आले. यावेळी कोल्हापुरात विविध ठिकाणी भेटी घेऊन शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात ते आले. ते आल्याची माहिती मिळाल्यावर चाहत्यानी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी दत्त महाराजांची प्रतिमा त्यांना भेट दिली. यावेळी नवल खोंबारे यांनी तेंडुलकर कुटुंबीयांना मंदिराची माहिती दिली. त्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मठात जाऊनही त्यांनी दर्शन घेतले व नंतर कोल्हापूरकडे प्रयाण केले.