खंडपीठासाठी कोल्हापूर दणाणले, लक्षवेध महारॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

सध्या अनेक भागातील विविध मुद्दे खूपच गाजत आहेत. सध्या कोल्हापूर खंडपीठाचा मुद्दा जोर धरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, पक्षकार, सिटीझन फोरमसह सेवाभावी संस्था, संघटना, तसेच औद्योगिक, व्यावसायिक संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लक्षवेध महारॅलीला मंगळवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

यावेळी घोषणांनी शहर दुमदुमून गेले. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, वरिष्ठ, ज्युनिअर वकील, सामाजिक संस्था, संघटना महारॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर खंडपीठाबाबत वेळीच ठोस निर्णय न झाल्यास भविष्यात पुन्हा ‘आरपार’च्या लढाईचा निर्धार यावेळी करण्यात आला.