आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे २० डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला येथे मुक्कामाला होते. त्या किल्ल्याची झालेली पडझड व दुरवस्था झाली होती.त्याला मूळ स्वरूप आणून संवर्धन करण्याच्या कामाला २६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याला मूळ रूप येईल. दीड कोटी रुपयांच्या आराखड्यातून हे काम होत आहे.
मंगळवेढा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभीकरण व नूतनीकरण कार्यारंभ सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झाला. सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १६ व्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सवंगड्यांनी या भूमीतील गड किल्ले हे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.
हिंदवी स्वराज्याची ही अस्मिता चिरंतन प्रेरक ठेवली. आपल्या संतभूमीमध्ये असणारा हा गड किल्ला सुव्यवस्थित आणि पर्यटनदृष्ट्या लोकाभिमुख तसेच ऐतिहासिक विचारांचा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवराय व सरनोबत नेताजी पालकर मंगळवेढा किल्ल्यावर चालून आले.
मंगळवेढा किल्ला १९ डिसेंबर १९६५ ला आदिलशहाच्या ताब्यातून घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९६५ रोजी शिवाजीराजेव मिर्झाराजे यांनी किल्ल्याची पाहणी करून मंगळवेढ्यातील किल्ल्यावर मुक्काम केला. आज या ठिकाणी शासनाचे प्रांताधिकारी कार्यालय, तालुका निरीक्षक भूमिअभिलेख, उपकारागृह इत्यादी प्रशासकीय कार्यालये कार्यरत आहेत.