हुपरीच्या श्री अंबाबाई देवीच्या यात्रेला सुरूवात, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील यात्रा सुरु झालेली आहे. हुपरी शहराची वरदायिनी श्री अंबाबाई देवीची यात्रेची लगबग उशिरा का होईना सुरू झाली आहे. यात्रेच्या पूर्वसंधेला मंडप पूजेनंतर धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. गुरूवारी पहाटे सासन काट्यांच्या आगमनाने धार्मिक वातावरणात पाहिली पालखी सोहळा मोठ्या  झाला आहे. अंबाबाईच्या नांवान चांगभलं च्या गजरात, वाजत गाजत देवीची मिरवणुक काढण्यात आली.

या मंगल प्रसंगी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रस्ते फुलांच्या पाकळ्या व रांगोळीने सजले होते. बुधवार पहाटे गुरुवारी २० तारखेला हुपरी येथील मानकरी पाटील, नाईक, कुंभार, माळी, तेली, परीट, कांबळे, व या गावचे मानकरी पाटील यांच्या चंदूर, शेमनेवाडी, कबनूर, माणकापूर आदी सर्व मानाच्या सासणकाठ्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाजारपेठेतील हुतात्मा चिटणीस चौकात आगमन झाले. देवीच्या पालखीसमोर गोंधळी सुदर्शन खाडे , अरविंद गोंधळी, रवि गोंधळी विकास बहाद्दूरे आदीसह गोंधळी बांधव देवीचे गुणगान गात होते.

भावपुर्ण वातावरणात सासनकाठ्या पालखी समोर नाचविल्या जात होत्या . नजरेचे पारणे फेडणारा हा उत्सव पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली होती. रुढी-परंपरेने चालत आलेल्या धार्मिक कार्यक्रम सुरू असून पाळणे-वाले, खेळणे- वाले, किरकोळ विक्रेते यासह विविध प्रकारचे स्टॉल्स नाना विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आह. तर फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर वेढा पडला आहे .

एकंदरीत यात्रेला प्रारंभ झाला असून शुक्रवारी भरयात्रा तर शनिवारी निकाली निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. वादग्रस्त परिस्थितीतून काही अघटीत घडू नये यासाठी हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस इन्स्पेक्टर निंगाप्पा चौखंडे यांनी कडक बंदोबस्त ठेवून कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली आहे.