हुपरीत चांदी कारखानदार असोसिएशनला ‘भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र प्रदान….

हुपरी येथील चांदी कारखानदार असोसिएशनला उद्योग मंत्री उदयरावजी सामंत यांच्या हस्ते “भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष दिनकरराव ससे व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.
चांदी कारखानदार असोसिएशनच्या पाठपुराव्याने भौगोलिक उपदर्शन (जीआय) रजिस्ट्री – भारत सरकार यांच्याकडून हुपरी येथील सर्व प्रकारच्या उत्पादित चांदी हस्तकला दागिने यांना केंद्र शासनाकडून दि. ३० मार्च २०२४ रोजी ” हुपरी सिल्वर क्राफ्ट” हे जीआय मानांकन मंजूर झालेले होते.

हे मानांकन मिळवून देणेकामी नाबार्ड – कोल्हापूर हस्तकला बोर्ड व जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर मानांकनाचे सर्टिफिकेट उद्योगमंत्री उदयरावजी सामंत यांच्या हस्ते आज कोल्हापूर येथील विशेष शासकीय कार्यक्रमांतर्गत देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी व औद्योगिक / उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होत