अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकीला पहिल्यानंतर अभिनेत्यावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. दिग्दर्शत लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाचं विश्लेषक आणि प्रेक्षकांकडून सतत कौतुक होत आहे.

हा एक बायोपिक सिनेमा आहे ज्याची कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या बलिदानावर आधारित आहे.14 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने 33 कोटींची कमाई केली. दिवसागणिक सिनेमाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन सात दिवस झाले असून, सिनेमाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
सिनेमा पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमाचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे.बुलेट ट्रेनच्या स्पीडने ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजल मारताना दिसत आहे. जगभरात सिनेमाने 270 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 31कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 37 कोटी रुपयांचा कमाई केली. तिसऱ्या सिनेमाने 48.5 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली… तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसला. चौथ्या दिवशी सिनेमाने 24 कोटी रुपये, तर पाचव्या दिवशी 25.25 रुपयांचा गल्ला जमा केला.
सहाव्या दिवशी सिनेमाने 32 कोटी रुपयांची कमाई केली. सांगायचं झालं तर, शिवजयंतीला प्रेक्षकांनी ‘छावा’ सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. सलग सातव्या दिवशी देखील सिनेमाने 22 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे सिनेमाने सात दिवसात 219.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच बोलबाला दिसत आहे.