टॉप 6 स्पर्धाकांमुळे रंगला ‘बिग बॉस’ शो, कोण होणार विजेता?

काही तासांत ‘बिग बॉस 5’ शोच्या विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांची आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात कोणता स्पर्धक ‘बिग बॉस 5’ शोची ट्रॉफी घरी घेऊन जाईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त निक्की – अरबाज यांच्यातील कनेक्शन, सूरज झापूक झुपूक अंदाज, इतर स्पर्धकांचे वाद, अपमान आणि टास्कची चर्चा रंगली आहे. घरातील दमदार स्पर्धांमुळे टीआरपी लिस्टमध्ये देखील शो अव्वल स्थानी आहे. धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामुळे ‘बिग बॉस’ शो रंगला.

शर्यतीत धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण आहेत. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी कोण बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण जिंकरणार अशी चर्चा सुरु असताना, सोशल मीडियावरचे वोटिंग ट्रेंड सध्या काय सांगतात याबाबत जाणून घेऊ. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वोटिंग लिस्टनुसार, पहिल्या स्थानी सूरज चव्हाण आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अभिजीत, धनंजय यांचा क्रमांक लागतो. वोटिंग लिस्टनुसार निक्की आणि जान्हवी शेवटी आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी विजेता कोण असेल… स्पष्ट होईल.