सांगोला तालुक्यातील जवळा येथील एका हॉटेलच्या शेडला वेल्डिंग मारताना तोल जाऊन पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून एका १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हि घटना दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जवळा येथे घडली. याप्रकरणी दिनांक २० फेब्रुवारी रोजी वशीम अब्दुलरहमान शिकलकर शास्त्रीनगर, सोलापुर यांनी सांगोला पोलीसात खबर दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ता. २० फेब्रुवारी रोजी फिर्यादी व दोन मित्र मोहम्मद हुसेन खेरदी व रिहान फारूख शेख असे वेल्डींगचे काम करण्यासाठी मौजे जवळा येथे आले होते. जवळा येथील प्रमोद पंडीत साळुंखे यांच्या जवळा चौकातील हॉटेलचे पत्रा शेडचे वेल्डींग मारण्याचे काम चालु असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रिहान फारूख शेख याचा बेल्डींग मारत असताना लोखंडी पाईपावरून तोल गेल्याने तो खाली पडला व त्यास डोक्यास मार लागल्याने त्यास स्पंदन हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तो उपचार दरम्यान मयत झाल्याचे सांगितले, असे पोलीसात दिलेल्या खबरीत म्हंटले आहे.