इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 हंगामासाठीचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे.इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 हंगामासाठीचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे.
एकूण 333 खेळाडूंचा लिलाव होणार असून संघांकडे एकूण 77 स्लॉट आहेत, त्यापैकी 30 विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.या लिलावात 23 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर 13 खेळाडूंनी 1.5 कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये राहणे पसंत केले आहे.
333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत, ज्यापैकी दोन असोसिएट देशांचे आहेत.
उद्याच्या लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या 116 आहे, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या 215 आहे.आयपीएलचा लिलाव देशाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
IPL 2024 लिलाव स्थानिक वेळेनुसार (दुबई) सकाळी 11:30 वाजता, म्हणजेच भारतात दुपारी 1 वाजता सुरू होईल.स्टार स्पोर्ट्स हे IPL 2024 लिलावाचे अधिकृत प्रसारक असल्याने तुम्ही स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी अशा अनेक चॅनवर लिलाव पाहू शकता.
IPL 2024 लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅप आणि वेबसाइटवर पाहाता येणार आहे.