IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी, किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामान खेळण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टी 20 वर्ल्ड कप विजेता न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहेत. पहिला सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सोफी डिवाईन हीच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स पहिला सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स पहिला सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.