हातकणंगले तालुक्यातील केंद्रशाळा आळते येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या स्पर्धेमध्ये पहिली ते सातवीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना शील्ड देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. रोमा गडकरी यांनी प्रथम क्रमांकाचे तीन बक्षीस दिले. श्री. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आळते यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे दोन बक्षीस देण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव कांबळे तसेच शितल हावळे, विजय हुक्कीरे, आशिष भबान, सौ. जयश्री नलवडे मॅडम या सर्वांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दिले. तृतीय क्रमांकाचे सर्व बक्षीस शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रवीण शामराव मोहिते यांनी दिले. सर्वच बक्षीस दात्यांना प्रमाण पत्र देण्यात आले. कार्यक्रमास सौ. भारती पाटील यासह अंगणवाडी व दोन्ही शाळेचे सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी व त्याचे पालक आणि ग्रामस्थ हजर होते.