इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या २४ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने २४ ते २८ फेब्रुवारी या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रवी रजपूते यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रवी रजपूते यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. याच दिवशी सकाळी १० वाजता कामगार चाळ येथे श्री. दुर्गामाता मंदिर जिर्णोध्दार पायाभरणी आम. डॉ. राहूल आवाडे, खास. धैर्यशील माने, शिवसेना जिल्हा अध्यक्ष रविंद्र माने, माजी आम. प्रकाशराव आवाडे, माजी आम. सुरेशराव हाळवणकर यांच्याहस्ते होणार आहे. याचवेळी सांस्कृतीक भवनाचाही पायाभरणी पार पडणार आहे.

लिंबू चौक काडापूरे तळ भागात २५ फेब्रुवारीस सकाळी ९ वाजता समाधान वृध्दाश्रमास जीवनावश्यक भेट वस्तुंचे वाटप केले जाणार आहे. याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता लहान मुलांना गिफ्ट दिले जाणार आहे. २६ फेब्रुवारीस सकाळी १० वाजता आय. जी. एम. रुग्णालयात चंद्रशिला अॅकॅडमीतर्फे रूग्णांना फळांचे वाटप केले जाणार आहे. याचवेळी रवी रजपूते जनसंपर्क कार्यालयाजवळ निराधार महिलांना साडीचे वाटप केले जाणार आहे. तर २७ फेब्रुवारीस सकाळी १० वाजता दिव्यांगासाठी भेटवस्तूंचे वितरण केले जाणार आहे. तर याच दिवशी सकाळी १० वाजता चिकोडी गल्ली येथे बोअर खुदाई केली जाणार आहे. याशिवाय, २८ फेब्रुवारीस हाफपीच क्रिकेट स्पर्धाचे संपन्न होणार आहेत. या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते २४ फेब्रुवारी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारतील. हार- तुरे ऐवजी शैक्षणीक साहित्य वा द्यावे असे आवाहन रवी रजपूते वाढदिवस गौरव समितीतर्फे करण्यात आले आहे.