चेन्नई सुपर किंग्जने माजी भारतीय क्रिकेटपटू एस श्रीराम यांची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नवीन सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. एस श्रीराम आयपीएल २०२५ मध्ये सीएसके कोचिंग स्टाफचा भाग असेल.यामध्ये मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, माइक हसी (फलंदाजी प्रशिक्षक) आणि एरिक सिमन्स (गोलंदाजी सल्लागार) यांचा समावेश आहे.
श्रीधरन श्रीराम यांना कोचिंगचा भरपूर अनुभव आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कोचिंग स्टाफमध्ये त्याने ड्वेन ब्राव्होची जागा घेतली आहे.
ब्राव्हो आता कोलकाता नाईट रायडर्समध्ये मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे.सीएसके २३ मार्च रोजी मुंबईविरुद्ध खेळून आयपीएल २०२५ च्या हंगामाची सुरुवात करेल.चेन्नईमध्ये जन्मलेले श्रीराम २०१६ ते २०२२ पर्यंत ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. २०१९ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांची फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.ऑगस्ट २०२२ मध्ये, आशिया कप आणि टी२० विश्वचषकापूर्वी श्रीरामची बांगलादेशच्या टी-२० सल्लागार म्हणून श्रीधरन श्रीराम नियुक्ती करण्यात आली.आयपीएल २०२४ साठी लखनौ सुपर जायंट्समध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सामील झाला. त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केले.आयपीएल २०२४ साठी लखनौ सुपर जायंट्समध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्रीधरन श्रीराम सामील झाले होते. दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.
आयपीएल २०२५: चेन्नई सुपर किंग्ज संघ- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवींद्र, आर अश्विन, विजय शंकर, अंशुल कंबोज, सॅम करन, दीपक हुडा, जेमी वृत्तन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, गुर्जपनीत सिंग, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मथिशा पाथिराणा.
