सध्या अनेक विकासकामे अनेक भागात सुरु आहेत. वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली मॉडेल स्कूल योजना युती शासनालाही पसंत पडली. त्यामुळे ही संकल्पना राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. सांगलीतील मॉडेल स्कूलची पुरेशी कल्पना अन्य जिल्ह्यांना नाही विदर्भ मराठवाड्यातील काही शाळांतील शिक्षकांनी सांगलीत येऊन मॉडेल स्कूलची पाहणी केली आहे. पण त्यातून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही त्यामुळे मॉडेल स्कूल संकल्पना राज्यभरात राबविण्यासाठी शासन अध्यादेश काढण्यात येणार आहे
आमदार जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील मॉडेल स्कूलचा राज्यासाठी मसुदा…
