मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर जयंत पाटलांची खोचक टिप्पणी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांची मोठी तयारी सुरू आहे, बैठका, गाठी-भेटी, चर्चा, दौरे, मतदारसंघावरील दावे यांना वेग आला आहे. अशातच राज्यातील महायुतीत असेलेल्या पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काल मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक झाल्याची माहिती आहे. यात अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव दिल्याची बातमी आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.जयंत पाटील बोलताना म्हणाले, मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील. त्यांची मागणी करावी अशी पोजिशन आहे असं ही मला वाटत नाही. निवडणुकीपूर्वी अशी मागणी ते करतील असे मला वाटत नाही. ही बाहेर कुणीतरी खोटी बातमी पसरवली असेल.

भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे तिथे अनेकांना तिथे मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यावर जयंत पाटील म्हणाले, त्यांच्या आघाडीबाबत मी बोलणे योग्य नाही. कृती होण्याअगोदर बोलणे योग्य नाही.