सांगली जिल्ह्यातील सहकार मोडीत काढण्याचा इस्लामपूर पर्टन बंद पाडणार : आ. पडळकर

सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्था मोंडीत काढण्याचा इस्लामपूर पर्टन आमदार जयंतराव पाटील यांनी राबविला असून तो मी मोडीत काढणार आहे. सहकारी कारखान्यावर मर्यादा पेक्षा जास्त कर्ज जिल्हया बँकेने का दिले असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. संस्थावर कर्ज काढणे व परत ते विकण्यास काढणे ते कमी पैसण्यात विकत घेण्याचा डाव जिल्हा बँकेकडून चालू आहे. त्यामुळेच सांगली जिल्हा बँकेवर प्रशासनाची नेमणूक करणार असल्याचे वक्तव्य आ. गोपीचंद पडळकर यांनी माणगंगा बचाव समितीत केले.

यावेळी कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी, कर्जदार, सभासद, जमिनमालक या सर्वांनी मिळून शनिवारी माणगंगा बचाव समिती आ.गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत स्थापन केली आहे. यावेळी कारखान्याबाबत प्रत्येकांनी मते मांडली. आ. पडळकर म्हणाले, सध्या माणगंगा साखर कारखाना विक्रीसाठी जिल्हा बँकेच्या हालचाली सुरू असून कारखाना विकत घेऊन त्यावर प्लॉटीग करण्याचा उद्योग नेहमी प्रमाणे करणार आहेत. यावेळी नवनाथ मेटकरी, नाथा सरगर, अनिल हाके, सोमनाथ कोळेकर, जीवन कासार, किरण पुजारी, राजाराम हाके, बंडोपंत हाके, मोहन पडळकर, चंद्रकांत कोळे, विनायक पाटील, राहुल सपाटे, दादासो मोटे, सर्जेराव मासाळ आदी उपस्थित होते.