इस्लामपूर,अतिवृष्टी आणि महापूराचा तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू पाटील समूहातील संस्थांनी पाच ट्रक जीवनावश्यक वस्तू व जनावरांना पशुखाद्य पाठवून मदतीचा हात दिला आहे.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ व राजारामबापू सहकारी बँक आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. आ. जयंतराव पाटील हे अतिवृष्टी व महापूराचा तडाखा बसलेल्या सोलापूर, बीड, धाराशिव, माढा आदी परिसरातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून त्यांना दिलासा देण्यासाठी गेले आहेत. त्यांच्या सूचनेवरून राजारामबापू समूहातील सहकारी संस्थांनी ही मदत पाठविली आहे. पिण्याचे पाणी , बिस्किटे तसेच जनावरांसाठी पशुखाद्य आदी वस्तूंचा समावेश आहे.
याप्रसंगी राजारामबापू सह. बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, संचालक पोपट जगताप, अनिल खरात, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, दादासो मोरे, शैलेश पाटील, अमरसिंह साळुंखे, रामराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, युवक कार्याध्यक्ष देवराज देशमुख, विकास पवार, संजय जाधव यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित होते.
