इस्लामपुरात मराठा समाजभूषण पुरस्काराचे शुक्रवारी वितरण

सध्या अनेक भागात अनेक नवनवीन उपक्रम, योजना राबविल्या जातात. ज्याचा नागरिकांना फायदा होत राहतो. इस्लामपूर येथील मऱ्हाठमोळा युवक मंडळाच्यावतीने गेली ३३ वर्षापासून देण्यात येणारा ‘मराठा समाजभूषण’ पुरस्कार यावर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले व मराठा उद्योजक संतोष पाटील यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण शुक्रवार ता. २८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वा. होणार असल्याची माहिती अध्यक्ष राकेश पाटील व अभिजित पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या व्यक्तींसाठी मऱ्हाठमोळा युवक मंडळाच्यावतीने पुरस्कार देण्यात येतो.

संस्थापक सुरेंद्रदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. पुरस्काराचे वितरण शुक्रवार ता.२८ रोजी विजया सांस्कृतिक भवन येथे होणार असून आ. सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी व अॅड. धैर्यशील पाटील, वैभव शिंदे, जयराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन राकेश पाटील व अभिजित पाटील यांनी केले.