उद्या सगळीकडे महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. उद्या मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वाळवा तालुक्यातील पेठ येथील महाशिवरात्रीनिमित्त दि. २६ रोजी दत्त महादेव मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, सकाळी ९ वाजता श्रीशिवलीलामृत ग्रंथाचे वाचन. सायंकाळी ५ वाजता अभिषेक, बिल्वार्चन, शिवपाठ नंतर महाआरती होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहेश्वर मूर्ती महेश स्वामी, उमेश स्वामी यांनी केले आहे.
उद्या महाशिवरात्रीनिमित्त पेठमध्ये दत्त महादेव मंदिरात विविध कार्यक्रम
