इचलकरंजीत सूत, कापड दर स्थिरतेमुळे व्यापाऱ्यांचा कापड खरेदीकडे कल

वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजी शहर नावारूपास आहे. या ठिकाणी यंत्रमाग कामगार यांची संख्या खूपच आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरीत नानाविध प्रकारच्या कापडाचे उत्पादन घेतले जाते. जगाच्या बाजारपेठेत येथील गुणवत्तापूर्ण कापडाला नेहमीच मागणी असते. मात्र, अनेकवेळा बाजारपेठेतील सट्टाबाजाराचा तसेच कमोडीट मार्केटचा मोठा फटका यंत्रमागधारकांना बसतो. यामध्ये  अनेकवेळा जेव्हा कापडाला मागणी वाढणार असे चित्र -दिसते तेव्हा सूत दर वाढतात. यामुळे उत्पादन खर्च वाढतो. परिणामी बाजारपेठेत याचा विपरित परिणाम होताना दिसते.

कापडाचे दर आणखी कमी येतील यामुळे कापडाची मागणी थांबते. असेच काहीसे चित्र गेल्या अनेक वर्षापासून पहायला मिळते. सध्या बाजारपेठेत सूत दरात काहीप्रमाणात वाढ झाली. प्रतिकिलो चार ते पाच रूपयांची दरवाढ झाली. मात्र, त्यानंतर सूत दर स्थिर राहिले आहेत. कापड दरात कोणतीही वाढ झाली नसली तरी दर स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. बाजारपेठ स्थिर असल्याचे कापड व्यापारी देखील कापडाची मागणी करू लागले आहेत. तथापि आपसातील स्पर्धेमुळे यंत्रमागधारक बळी पडत असल्याचे दिसते. आपापसातील या स्पर्धेमुळे स्वतः उत्पादित केलेल्या गुणवत्ता पूर्ण कापडावर नफा मिळविण्याचे ज्ञान येथील यंत्रमागधारकांनी आत्मसात करणे अपेक्षित आहे.

लाखो, करोडो रूपयांची गुंतवणूक करून जेमतेम नफा मिळविण्या पलिकडे यंत्रमागधारकांकडून काहीच केले जात नाही. याचा गैरफायदा व्यापारी तसेच अन्य लोक घेत असून यंत्रमागधारक मात्र आजही आहे तिथेच असल्याचे दिसते. त्यामुळे स्पर्धेला बळी न पडता कारखानदारांनी आपल्या उत्पादनाला अधिक नफा कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या बाजारपेठेत वस्त्रनगरीतील गुणवत्तापूर्ण कापडाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कारखानदारांनी आता अभ्यासपूर्ण माहिती घेऊन व्यापार करणे ही काळाची गरज बनली आहे.