येडेनिपाणी येथे आजपासून २८ फेब्रुवारीअखेर विविध धार्मिक कार्यक्रम

अनेक भागात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील प्राप्त होतो. आज महाशिवरात्री सर्वत्र साजरी केली जात आहे. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे महाशिवरात्रीनिमित्त मल्लिकार्जुन मंदिरात २६ ते २८ फेब्रुवारीअखेर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी केले आहे.

२६ रोजी शिवलीलामृत ग्रंथ पारायण, २७ रोजी दिगंबर ठाणेकर, संतोष संदे, नाना गाताडे यांच्याकडून भजनसेवा तसेच नऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन. २८ रोजी पालखी सोहळा, कृषी अधिकारी रामभाऊ कांबळे फुले पालखी सोहळ्यासाठी देणार आहेत.