आष्टा नगर परिषदेच्या इमारतीचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कायापालट…..

सरकारकडून अनेक योजनांमधून विकास साधण्यासाठी निधी मंजूर केला जातो. यामुळे अनेक विकास कामे करून अनेक शहराचा कायापालट झालेला दिसून येत आहे. असाच कायापालट आता वाळवा तालुक्यातील आष्टा शहराचा झाला आहे. आष्टा नगर परिषदेची ब्रिटिशकाळात स्थापना झाली आष्टा नगर परिषदेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ रोजी ब्रिटिशकाळात झाली. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रुपये खर्चून नगर परिषद इमारत नूतनीकरण करण्यात आहे.

नगर परिषदेची अद्ययावत इमारत शहराच्या वैभवात भर घालत आहे. नगर परिषद निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या नूतन नगराध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह पालिका मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन तसेच भव्य सभागृह उपलब्ध होणार आहे. आष्टा नगर परिषदेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवीत राज्यातील एक आदर्श नगर परिषद म्हणून लौकिक प्राप्त केला आहे.

आष्टा नगर परिषदेच्या इमारतीचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कायापालट करताना तळमजल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती यांची, तर पहिल्या मजल्यावर मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची कार्यालये अद्ययावत करण्यात येत आहे. दुसऱ्या मजल्यावर सुमारे एक कोटी खर्चून सभागृह उभारण्यात आले आहे. नगर परिषदेला रंगरंगोटी तसेच आकर्षक सजावट केली आहे. अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालने उपलब्ध झाली आहेत. निवडणुका झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांना दालने मिळणार आहेत.