सुलतानगादे येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

अनेक भागात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील प्राप्त होतो. आज महाशिवरात्री सर्वत्र साजरी केली जात आहे. खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुहागर-विजापूर महामार्गालगत असणाऱ्या महादेव मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, मंदिरात सकाळी अभिषेक, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.