आजपासून कोरोची महाशिवरात्री यात्रा व ऊरुसास प्रारंभ!तीन दिवस होणार भरगच्च कार्यक्रम….

आज सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. कोरोची येथील जागृत ग्रामदैवत श्री मारुती देव, श्री न महादेव महाशिवरात्र यात्रा व लंगरी साहेब ऊरुसानिमित्त २६ फेब्रुवारी ते १ मार्च अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती कोरोची महाशिवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच डॉ. संतोष भोरे यानी दिली. बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र यात्रेनिमित्त सायंकाळी ७ वा ग्रामदैवत श्री मारुती देव व श्री महादेव देव यांना महाअभिषेक, आणि भव्य आतषबाजी.

गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी भर यात्रा असून सायंकाळी ६ वाजता ऊस गाड्यांची मिरवणूक व ऊस लुटणेचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. श्री लंगरी पीरसाहेब गंध चढविणे, रात्री ९ वा. श्री मारुती देव पालखी मिरवणूक व नयनरम्य आतषबाजी व रात्री १० वा. कोमल कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा. तर शुक्रवारी पहाटे ५ वा. परत श्री मारुती देव पालखी मिरवणूक व नयनरम्य आतषबाजी हातकणंगले तालुका शिवसेना प्रमुख आनंद शेट्टी यांच्या हस्ते, सकाळी ९ वा. श्री गुरु महाराज रथोत्सव, दु. १२ वा. गुरुमहाराज यांना साखर नेणे,

दुपारी ३ वा. आमदार राहूल आवाडे यांच्या हस्ते निकाली कुस्त्याचे जंगी मैदान, सायंकाळी ७ वा. लंगरीसाहेब पीर गलिफ चढविणे रात्री १० वा. झंकार आर्केस्टा, शनिवारी १ मार्च रोजी सायं. १० वाजता किशोर कुमार नाईट हा कार्यक्रम होणार आहे. तरी ग्रामस्थांनी यात्रा व ऊरुस शांततेने पार पाडावे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच यात्रा कमिटी अध्यक्ष डॉ. संतोष भोरे यानी केले आहे.