सध्या अनेक मागण्यांसाठी अनेक आंदोलन, उपोषण देखील करण्यात येते. मंगळवेढा नगरपरिषद हद्दीतील गावठाण भागामध्ये झालेल्या अतिक्रमणावर कारवाई काढण्याच्या मागणीसाठी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेवर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा माळी गल्लीतील रहिवाशांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सांगोला नाका येथून काही अंतरावर असणाऱ्या एका महाविद्यालयासमोर एक इसम गेली १ वर्षापासून टप्याटप्याने अतिक्रमण करत असून, आतापर्यंत त्याठिकाणी तीन गाळ्याचे पत्राशेड बनवले आहे.
जवळपास १ एकर परिसराला तारेचे कंपाउंड केले असून माझीच जागा असल्याच्या अविर्भावात तो सध्या वावरत आहे. सदर जागा ही गावठाण हददीतील असल्याचे मुख्याधिकारी यांनी मान्यही केले होते.
त्यानुसार दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी नगरपालिकेच्या वतीने सदर अतिक्रमणधारकास ५ दिवसाचे आत अतिक्रमण काढण्याची नोटीस देखील बजावली होती. परंतु अजूनही त्यावर कारवाई झालेली नाही. सदर घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी न.पा. कार्यालयावर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.