‘स्वच्छ भारत योजना’ इचलकरंजीतून होणार शुभारंभ!

विद्यार्थ्यांनी घरातील स्वच्छ असा वस्त्रोद्योगातील एकदाच आणावयाचा असून शासनाने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यासाठी इचलकरंजीची निवड केली आहे. याबाबत पालकांनी संभ्रम निर्माण करु नये, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांनी सांगितली.

शासनाच्यावतीने वस्त्रोद्योगातील कचरा व स्वच्छ प्लास्टिक आठवड्यातून एकदा घरातून गोळा करुन शाळेमध्ये संकलन करण्याचा उपक्रम राबविण्याचा विचार आहे स्वच्छ भारत योजनेला व्यापक स्वरूप मिळण्याचा उद्देश शासनाचा असून इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगनगरी असल्याने सदरच्या उपक्रमास इचलकरंजीतून शुभारंभ करण्यात आला आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या घरामधील वस्त्रोद्योगाचा स्वच्छ कचरा ( चिंध्या, फाटकी कपडे, सूत दोरा) तसेच प्लास्टिकचा स्वच्छ कचरा(कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू) असा स्वच्छ स्वरूपातील कचरा आठवड्यातून एकदा शाळेमधील संकलन डब्यामध्ये जमा करायचा आहे.

घरातील घाण कचरा हा दारामध्ये येणाऱ्या घंटागाडीमध्ये टाकावयाचा आहे. त्यामुळे पालकांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये असे आवाहन आरोग्यधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी सांगितले.