इचलकरंजीत भाजपच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

काल सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इचलकरंजी शहरात देखील मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे शहराध्ययक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे व संविधान फोटोचे पूजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. तसेच श्रीफळ वाढवून पुष्पहार अर्पण करून ध्वज पूजन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ट कार्यकर्ते श्री. जगन्नाथ नगरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

यावेळी, सरचिटणीस राजेश रजपुते, महिला मोर्च्या अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, धोंडीराम जावळे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अशोक स्वामी, सौ. उज्वला गायकवाड, नागूबाई लोंढे, सं.गां.नि.यो. समिती अध्यक्ष अनिल डाळ्या, पांडुरंग म्हातुगडे, महादेव हाळवणकर, सतिश पंडित, उमाकांत दाभळे, मारुती पाथरवट, चंद्रकांत चौगुले, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, शेखर शाहा, नर्सिंग पारीक, राजू बोंद्रे, अमर कांबळे, अमित जावळे,अरुण कुंभार, विनोद कांकाणी, सौ.योगिता दाभोळे, ऋषभ जैन, किसन शिंदे, जयदिप पाटील, सौ.संगिता साळुंखे, सौ.संगिता घोरपडे, सौ.माधवी मुंडे, सौ. सीमा कमते, सौ. सपणा भिसे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.