मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. सह्याद्री पर्वत रांगांच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
कुरुंदवाड, इचलकरंजी, पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी आले आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कुरुंदवाडला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील शिरडून गावाजवळील पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला आहे. सध्या ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने फिरवण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेल्यात आहेत. तसेच कर्नाटकलाही जोडणारे काही रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे.