सांगोला तालुक्यातील या गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेकडे फिरवली पाठ,  सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहेच. सध्या या भागात देखील अनेक विकासकामे करण्यास सुरवात होत आहे. सांगोला तालुक्यातील महिम हे गाव अंदाजे या गावची लोकसंख्या आहे. सात हजाराच्या आसपास तर मतदारांची संख्या आहे पाच हजारापेक्षा जास्त आणि या गावात ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पंधरा आहे. नागरिकांनी निवडून दिलेले हे सदस्य ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग किंवा ग्रामसभेला कधीतरी हजर असतात. आपल्या वार्डातील नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करणे व त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची कर्तव्य असतात.

पण सदस्य जर ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहत नसतील तर वार्डातील नागरिकांच्या तक्रारीचे निरसन कसे होणार वार्डातील सदस्य मिटींगला हजर राहत नसल्याने व नागरिकांच्या तक्रारीची दखल ग्रामपंचायत मध्ये घेतली जात नसल्याने अनेक अर्ज ग्रामपंचायतकडे पेंडिंग आहेत. नागरिकांना नाईलाजाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज करावे लागतात यामध्ये नागरिकांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे गावचे गाव पण गमावून बसण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर येत आहे. सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यात घेतलेली ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरळीत व्हावी यासाठी ग्रामसेवकांनी सांगोला पोलीस स्टेशनला पत्र देऊन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग पार पडली पण मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीने घेतलेल्या मासिक सभेसाठी पंधरा पैकी फक्त सरपंच आणि उपसरपंच हे दोघेच उपस्थित होते. उर्वरित तेरा सदस्य ग्रामपंचायतच्या मासिक सभेसाठी आले नाहीत सदस्य उपस्थित नसल्याने सभा तहकूब झाली.

गावातील ग्रामपंचायतच्या मासिक सभेला आणि ग्रामसभेला सदस्य उपस्थित राहत नसतील तर शासनाने ग्रामपंचायतची मासिक सभा सर्वांसाठी खुली करावी व त्या मासिक सभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळवी म्हणजे नागरिकांचे प्रश्न व अडीअडचणी तात्काळ सुटतील अशी नागरिकांना अशा वाटत आहे सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे गावच्या विकास कामावर परिणाम होत असल्याने गावचे ग्रामसेवक देखील बदली करून जाण्याच्या मार्गावर असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.